भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन यांनी मोठे वक्तव्य करत म्हटले आहे की, "जर रोहित शर्मा फॉर्ममध्ये राहिला, तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकेल." त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.
रोहित शर्माने नुकत्याच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भेदक शतक झळकावून जबरदस्त फॉर्ममध्ये पुनरागमन केले. कटक येथे झालेल्या या सामन्यात रोहितने अप्रतिम खेळी करत 100 पेक्षा अधिक धावा केल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
रोहितचा खेळ भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याच्या कामगिरीवर संघाच्या यशाचे गणित अवलंबून आहे, असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. अझहरुद्दीन यांनीही त्याच विचाराला दुजोरा देत सांगितले की, "जर रोहित शर्मा फॉर्ममध्ये राहिला आणि चांगली कामगिरी केली, तर भारत नक्कीच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकेल."
भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण मागील काही वर्षांत भारताने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, पण विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय संघ आणि चाहत्यांना या स्पर्धेतील विजयाची आतुरता आहे.
आता रोहित शर्मा आपल्या कामगिरीत सातत्य ठेवतो का आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसा खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारत आणि पाकिस्तान यांचा सामना विस फेब्रुवारी रोजी आहे.

0 Comments